दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग ३५
गौरवीने हळूच मान वर केली…
डोळ्यांत थोडीशी भीती..., थोडीशी ओढ... आणि खूप सारा विश्वास…
“तू न सांगता समोर आलास ना आज… त्या एका क्षणात
माझ्या सगळ्या थकलेल्या दिवसांना आज अर्थ मिळाला…”
ती हळू आवाजात म्हणाली...
माझ्या सगळ्या थकलेल्या दिवसांना आज अर्थ मिळाला…”
ती हळू आवाजात म्हणाली...
माधव काहीच बोलला नाही… तर फक्त गालातल्या गालात हसत... टेबलवर ठेवलेला तिचा हात अलगद धरला…
“दूर असणं कठीण आहे… पण ते तुटणं त्याहून जास्त वेदनादायी आहे…”
तो शांतपणे म्हणाला,
“आणि मी तुझ्यापासून कधीच तुटलो नाही… तर फक्त काही वेळासाठी दूर झालो आहे...”
तो शांतपणे म्हणाला,
“आणि मी तुझ्यापासून कधीच तुटलो नाही… तर फक्त काही वेळासाठी दूर झालो आहे...”
गौरवीच्या ओठांवर हलकंसं हसू आलं… पण तीचे डोळे मात्र नकळत ओलावले…
“मी वाट पाहतेय माधव… पण फक्त वेळेची नाही… तर त्या दिवसाची, ज्या दिवशी आपल्याला ‘दूर’ असं काही उरणारच नाही…” ती म्हणाली...
माधवने घट्ट श्वास घेतला…
“तो दिवस येईल… आणि तेव्हा मी तुला पुन्हा सांगणार नाही
‘वाट पाह’… तर तेव्हा म्हणेन... ‘आता कायम सोबत रहा’…”
“तो दिवस येईल… आणि तेव्हा मी तुला पुन्हा सांगणार नाही
‘वाट पाह’… तर तेव्हा म्हणेन... ‘आता कायम सोबत रहा’…”
"मग तो दिवस कधी येईल माधव...?" गौरवी
"खुप लवकर..." माधव
"पण मी आता तुझ्याशिवाय जगू शकत नाही रे... हे दोन महिने मला दोन वर्षांसारखे भासले होते... मी तुझ्याशिवाय कशी जगली हे मी शब्दात सुध्दा मांडू शकत नाही रे..." गौरवी...
माधव हलकंसं हसला, पण डोळ्यांत तीच ओढ होती…
" मी कधीपासून तुझ्या या शब्दांचीच वाट पाहत होतो... खरं सांगू मी सुद्धा तुझ्याशिवाय जगू शकत नाही... मी सुद्धा तुझ्याशिवाय कसे दिवस काढले हे मी सुद्धा शब्दात व्यक्त करू शकत नाही..." माधव
" मी कधीपासून तुझ्या या शब्दांचीच वाट पाहत होतो... खरं सांगू मी सुद्धा तुझ्याशिवाय जगू शकत नाही... मी सुद्धा तुझ्याशिवाय कसे दिवस काढले हे मी सुद्धा शब्दात व्यक्त करू शकत नाही..." माधव
माधव तिच्याकडे थोडा पुढे सरकतो…
आवाजात पहिल्यांदाच थोडीशी कापरं उतरलेली होती…
आवाजात पहिल्यांदाच थोडीशी कापरं उतरलेली होती…
“गौरवी… हे फक्त भेटीचं अंतर मिटवण नाही होतं… ते स्वतःला समजून घेण्याचं अंतर होतं…”
तो तिचा हात घट्ट धरतो…
“मला कळलं… प्रेम म्हणजे रोज समोर असणं नाही,
तर दूर असूनही एकमेकांपासून तुटून न जाणं असतं…”
तो तिचा हात घट्ट धरतो…
“मला कळलं… प्रेम म्हणजे रोज समोर असणं नाही,
तर दूर असूनही एकमेकांपासून तुटून न जाणं असतं…”
गौरवीच्या डोळ्यांतून दोन थेंब अलगद खाली घसरतात…
ती हसत म्हणते,
“मग आता पुन्हा दूर जाशील का…?”
ती हसत म्हणते,
“मग आता पुन्हा दूर जाशील का…?”
माधव मान हलकेच नकारार्थी हलवतो…
“नाही… आता अंतर फक्त कामापुरतं असेल…
मनाने, विचारांनी, आणि भविष्यात… मी तुझ्याच जवळ आहे…”
“नाही… आता अंतर फक्त कामापुरतं असेल…
मनाने, विचारांनी, आणि भविष्यात… मी तुझ्याच जवळ आहे…”
तो थोडा थांबतो… आणि ठाम आवाजात म्हणतो,
“मी घरी बोलणार आहे… लवकरच…
कारण मला वाट पाहायची नाही… तर तुला माझ्या आयुष्यात कायमचं ठेवायचं आहे…”
“मी घरी बोलणार आहे… लवकरच…
कारण मला वाट पाहायची नाही… तर तुला माझ्या आयुष्यात कायमचं ठेवायचं आहे…”
गौरवी अविश्वासाने त्याच्याकडे पाहते…
“खरंच…?”
“खरंच…?”
“हो…” माधव हसतो,
“कारण आता ‘उद्या’ म्हणत राहण्यापेक्षा
‘आपण’ म्हणायची वेळ आली आहे…”
“कारण आता ‘उद्या’ म्हणत राहण्यापेक्षा
‘आपण’ म्हणायची वेळ आली आहे…”
कॅफेच्या बाहेर दिवे लागले होते… संध्याकाळ रात्रीकडे झुकत होती…
आणि आत
दोन मनांना पहिल्यांदाच
भविष्यासाठी भीतीपेक्षा
आशा जास्त वाटत होती…
आणि आत
दोन मनांना पहिल्यांदाच
भविष्यासाठी भीतीपेक्षा
आशा जास्त वाटत होती…
कारण दोन मनं शब्दांपेक्षा जास्त एकमेकांवर विश्वास ठेवत होती…
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा